झुंडबळी
आणि राजकारण
अशोक सुतार / 8600316798
![]() |
| अफवा आणि झुंडशाही यांनी घेतलेला बळी - व्यंगचित्र /अशोक सुतार |
पालघरमध्ये
घडलेल्या प्रकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. आपल्या गुरूच्या अंत्यसंस्काराला
जाणाऱ्या तीन साधूंना चोर समजून जमावाने क्रूरपणे ठेचून ठार मारले. विशेष म्हणजे पोलीस
घटनास्थळी उपस्थित असताना हा रानटी प्रकार घडला आहे. ही घटना गडचिंचले या दुर्गम गावात
दि. १६ एप्रिल रोजी घडली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर बाहेर आलेल्या काही व्हीडिओंमुळे
आता यावर राजकारण केले जात आहे. गडचिंचले गाव व त्वेथील मतदारसंघ गेली दहा वर्षे भाजपच्या
अधिपत्याखाली आहे. पालघरमधील घटना गैरसमजुतीतून झाली असली तरी या घटनेची तीव्रता मोठी
असून प्रचंड क्रौर्य या घटनेत लपलेले आहे. येथील लोकांनी प्रथम चौकशी करून मगच कार्यवाही
करणे अपेक्षित होते. घटनास्थळावर पोलीस उपस्थिती असताना अशी घटना कशी काय घडू शकते,
असा सवाल सुज्ञ नागरिकांच्या मनात येत आहे.
या घटनेचे भांडवल करत भाजप नेत्यांनी
महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर तर उद्धव रिझाईन नावाचा
हॅशटॅग वापरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपाला उद्धव
ठाकरे यांना घालवण्यासाठी काहीतरी निमित्त हवे आहे. मुख्यमंत्रीपदाचा तांत्रिक पेच
निर्माण करत राज्यपालांनी या अगोदर लोकशाहीचा तमाशा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात
वांद्रे येथील मजुरांच्या लॉकडाऊनवविरोधी आंदोलनाची भर पडली. असंघटित मजूर एकाच दिवशी इतकाच वेळी एकत्र वांद्रे
रेल्वेस्टेशनवर आले हा काही चमत्कार नव्हता, तर भाजपावाल्यानी शिस्तबद्धरीतीने केलेला
तो मोठा प्रयत्न होता. पालघरच्या घटनेचे नवीन निमित्त भाजपवाल्याना मिळाले असून आता
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रान उठविण्याचा हीन प्रकार सुरु आहे.तरीही पालघरच्या घटनेचे
समर्थन होऊ शकत नाही, एवढी क्रूरता आणि रानटीपणा त्या कृत्यात आहे. पालघरमधील घटना स्थानिक लोकांच्या गैरसमजुतीतून
झाली आहे. या घटनेत कुठलाही धर्माचा मुद्दा नाही, त्यामुळे समाजमाध्यमांवर हिंदू साधूंवर
अन्याय झाला आणि त्याला राज्य सरकार कारणीभूत असल्याची हाकाटी पिटली जात आहे. त्यानिमित्ताने
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. खरे तर पालघरमधील हिंसाचाराची
घटना घडलेल्या गडचिंचले या गावातील ग्रामपंचायतीवर गेली 10 वर्षं भाजपची सत्ता आहे.
चित्रा चौधरी या भाजपच्या सरपंच आहेत. अटक झालेल्या आरोपींमध्येही बहुसंख्य भाजपचे
सदस्य आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. या घटनेतील सर्व
आरोपींना अटक करण्यात आली असून, 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भाजपच्या
बालेकिल्ल्यात घडलेल्या या मॉब लिंचिंगची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर टाकून त्यांचा
राजीनामा मागणे योग्य नव्हे. या प्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला. खरे तर पोलिसांनी
प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले पाहिजे. परंतु एका व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की,
एक साधू पोलिसाचा हात धरून लोकांपासून वाचवण्याची कळवळून विनंती करत आहे. सादर पोलिसाने
या साधूचा हात झटकून त्याला जमावाच्या स्वाधीन केले आणि तो घडला प्रकार स्वस्थपणे पाहत
आहे. असे जर समाजात रक्षक असतील तर पूर्वसामान्यांचे जगणे नेहमीच धोक्याचे आहे. कारण
जमावाला विचार नसतो, जमाव चिथावला गेला तर तो काहीही न पाहता समोर दिसेल त्या गोष्टी
नष्ट करू पाहतो. अशा वेळी पोलिसांनी त्या साधूंना संरक्षण देऊन पोलीस कार्यालयात आणणे
महत्वाचे होते. इथे पोलीस हतबल झालेले पाहायला मिळाले किंवा एखादा जबाबदार स्थानिक
लोकप्रतिनिधी पुढे येऊन त्याने जमावाला थांबवले नाही किंवा रोखले नाही. याला रानटी
मानसिकता म्हटले जाते. तीन साधूंची चौकशी न करता त्यांना काठयांनी ,दगडाने ठेचून जीवे
मारणे म्हणजे लोकशाहीला लज्जास्पद कृत्य होते. मानवतेला काळिमा फासणारे वर्तन यातून
दिसडले. जेव्हा एखाद्या परिसरात अशी घटना घडते, त्यावेळेस तेथील पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी
यांच्या चांगल्या गुणांची कसोटी लागते. परंतु इथे सर्व काही बेशिस्तीचा कारभार पाहायला
मिळाला. अशा नराधमांना कायद्याने शिक्षा होईल, परंतु ही प्रवृत्ती धार्मिकतेतून, हिंसक
मानसिकतेतून निर्माण होते. ही प्रवृत्ती जोवर देशात आहे, तोपर्यंत असे झुंडबळी जाणार
आहेत. मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले
म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक
निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने
त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरतला जायचेच
होते म्हणून ते माघारी फिरून आडमार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर
हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्रीच्या सुमारास पोहचले.त्याठिकाणी
वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते,
काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या
गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ दीड तासात पोलीस
आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत
त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे
काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जि. प. सदस्य काशीनाथ चौधरी यांनी
जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना आपल्या गाडीत बसवले.
मात्र, त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या
घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड,
काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली.दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गडचिंचले
येथे तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती.
त्यापैकी 9 आरोपी अल्पवयीन आहेत. अन्य 101 आरोपींना डहाणू कोर्टात हजर करण्यात आले.
त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा
शोध कासा पोलीस करीत आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आहे.
या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही समाजकंटक चोर, दरोडेखोर
येतात आणि किडन्या काढून नेतात अशा वेगवेगळ्या अफवा नागरिकांमध्ये पसरवत असल्याने धक्कादायक
प्रकार घडत आहेत. याच अफवांमुळे जमावाने तीन जणांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. कासा पोलीस ठाण्याचे पीएसआय कटारे व इतर
तीन कर्मचारीही जखमी झाले आहे. घटनेनंतर पालघर पोलीस दलाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी
दाखल झाला. तेव्हाही जमाव आक्रमकच होता. पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली, त्यावेळीही
काही हल्लेखोर लपून छपून पोलिसांवर दगडफेक करत होते. अशा स्थितीत जमाव पांगवण्यासाठी
जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी दोन राऊंड हवेत फायर केले. दरम्यान
पोलिसांनी 110 जणांना ताब्यात घेऊन अटक केली. अशाच प्रकारच्या अफवेमुळे जुलै 2018 मध्ये
धुळ्यात पाच जणांची ठेचून हत्या करण्यात आली होती. महाराष्ट्रातच नव्हे तर आसाममध्येसुद्धा
फिरायला गेलेल्या दोन संगीतकारांवर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू
झाला होता.अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत नारायण गिरी यांनी या घटनेवर टीका
करत म्हटले आहे की, जुना आखाड्याशी संबंधित दोन साधूंचा खून करण्यात आला आहे.यावेळी
देशात कलम–144 लागू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र कसे आले, असा सवालही त्यांनी
व्यक्त केला आहे.

No comments:
Post a Comment