Friday, 30 November 2018

ऐतिहासिक मराठा आरक्षण


ऐतिहासिक  मराठा आरक्षण
बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरुवारी दि. २९नोव्हेन्बर रोजी सादर करण्यात आले. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली. सभागृहात सर्वपक्षीय आमदारांनी एकच जल्लोष केला. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेली मराठा आरक्षणाची मागणी पूर्णत्वास गेली आहे. मराठा क्रांती मोर्च्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आत्तापर्यंत ६१ मोर्चे तेही शांततेत काढले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे खरे श्रेय मराठा क्रांती मोर्च्याच्या संघटकांना जाते. कारण यात कुणी नेता नव्हता; त्यामुळे आंदोलने कधीच भरकटली नाहीत.  यामुळे राज्य सरकारला मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडले. मराठा समाज आरक्षण विधेयक २०१८ या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली. राष्ट्रवादीने या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा दिला आहे. या विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात आले. तर, मराठा समाजाचा सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसइबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभा तसेच विधानपरिषदेत बिनविरोध मंजूर झाले असल्यामुळे मराठा समाजातून आनंद व्यक्त होत आहे. आता काही दिवसांत राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होणार असून आरक्षणाची अंमलबजावणी होण्यास प्रत्यक्षात सुरुवात होईल. राज्य सरकारसमोर मराठा समाजाच्या आरक्षणानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा व मुस्लीम आरक्षण मुद्दा आहे. तोही यथावकाश मंजूर होण्याची शक्यता आहे. धनगर आरक्षणावर पुढच्या अधिवेशनात त्यासंदर्भातला एटीआर मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल,से त्यांनी आश्वासन दिले आहे. या अहवालाच्या शिफारसींनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे.                                                                                              मराठा आरक्षण अहवालात अनेक शिफारसी करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाच्या लोकांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) म्हणून घोषित करण्यात येईल, राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आणि लोकसेवा आयोगात १६ टक्के आरक्षण मिळणार आहे, खासगी, अनुदानीत, विनाअनुदानीत शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळेल. फक्त अल्पसंख्याक संस्थांमध्ये नसेल, ओबीसी समाजाच्या आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण नसेल अशा शिफारसी मराठा आरक्षण दिलेल्या आहेत. धनगर आरक्षण अहवालातील शिफारसींची छाननी मंत्रिमंडळ उपसमिती करणार सून लवकरच हा अहवाल  मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे आभार मानले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, रासप, एमआयएम, आरपीआय, अपक्ष या सर्व विरोधीपक्ष नेत्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. मराठा समाजासाठी दि. २९ नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे. मराठा आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात सादर करण्यात आले. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. गुरुवारी दुपारी यासंदर्भात कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले. अहवालात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित करण्यात आलेला मराठा समाज संविधानातील अनुच्छेद १५(४), १६(४) मध्ये समाविष्ट केलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण तसेच मराठा समाजातील उमेदवारांना राज्यातील लोकसेवांमधील नियुक्त्या व पदे यात अशा प्रवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद आणि निवडणुकांच्या जागांकरिता आरक्षणाचा अंतर्भाव नसेल अशी तरतूद मराठा आरक्षणाच्या अहवालात करण्यात आली आहे.                                                                                                                                                                                                                        गुरुवारी सकाळपासूनच संपूर्ण राज्याचे मराठा आरक्षणाकडे लक्ष लागून होते. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील निष्कर्षांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी  सभागृहात ठेवला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये मराठा समाजाची  बिकट परिस्थिती नमूद केली आहे. ) राज्यातील जवळपास ३७.२८% मराठा समाज हा दारिद्रय रेषेखाली आहे. ) राज्यातील ९३% मराठा समाजाचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी आहे.) २०१३ ते २०१८ दरम्यान मराठा समाजातील एकूण २१५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ) भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) केवळ ६.९२% अधिकारी मराठा समाजाचे आहेत. यापैकी केवळ .२७% अधिकाऱ्यांची निवड थेट भर्तीद्वारे झाली आहे. ) भारतीय पोलिस सेवेत १५.९२% तर भारतीय वन सेवेत मराठा समाजाला .८७% स्थान आहे. )  उच्च, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाचे अल्प प्रतिनिधित्व सामाजिक अक्षमता, अयोग्य आर्थिक परिस्थिती आणि शैक्षणिक कमकुवतता दर्शवतेअसे राज्य मागास आयोगाने आपल्या निष्कर्षांमध्ये नमूद केले आहे. मराठा समाजाची परिस्थिती बहुतांशी बिकट आहे; त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण योग्य आहे.
                                                                                                                                               अशोक सुतार
                                                                                                                                             ८६००३१६७९८

                                                                                                                                              

 

 





Friday, 23 November 2018

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या : सरकार लक्ष देईल ?


शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या : सरकार लक्ष देईल ?

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे बाकीच्या शेतकऱ्यांचा धीर खचत आहे. राज्य सरकारने यावर उपाययोजना करावी यासाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मांडणे गरजेचे आहे. वाढत्या आत्महत्या होण्याचे कारण म्हणजे नापिकी, सावकारांचे घेतलेले कर्ज न फेडणे, सरकारची अनास्था, शेतकऱ्यांना सरकारबारातून येणाऱ्या मदतीतील होणारी गळती, दुष्काळी परिस्थिती यांमुळे आज शेतकरी राजा आत्महत्या करीत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी  आणि धर्मादाय संस्था व तरुण मंडळांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना धीर देणे काळाची गरज आहे. तर परिस्थितीत बदल होऊ शकतो. देशाचा पोशिंदा शेतकरी, त्याचे अस्तित्व नष्ट झाले तर आगामी काळात अन्नधान्य टंचाई जाणवेल. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे सत्र  देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे.                       विदर्भ, मराठवाडा आणि इत्तर दुष्काळी परिसरात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. आघाडी सरकारच्या सरकारच्या कार्यकालातही हीच परिस्थिती होती. गेली दोन वर्षे पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जमिनीत पेरले तरी पाऊस पाहिजे; परंतु पर्जन्यमान घातले आहे. त्याचा शेती व्यवसायावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. शेतकरी शेतीमध्ये उत्पन्न घेण्यापूर्वी मशागत करतो, बी- बियाणे पेरतो, खतांची मात्रा देतो आणि इत्तर बाबींसाठी  बराच खर्च आहे, पण शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसेल तर पीक करपून जाते. प्रसंगी खाजगी सावकाराकडून कर्ज काढले जाते किंवा बँकेतून कर्ज काढले जाते. ते फेडता आले नाही तर शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारतो. एकूण शेतकरी संकटात आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्याला पीककर्जाची हमी दिली जाते; परंतु ऑनलाइन अर्जासारख्या अनेक किचकट अटी असल्यामुळे आडाणी असलेला शेतकरी मोठ्या प्रमाणात वंचित राहतो. अजून आपला देश डिजिटल झालेला नाही. सत्ताधाऱ्यांनी सर्व बाबतीत संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही वाड्या वस्त्यांमधील शेतकरी या डिजिटल दुनियेपासून दूर आहे. शेतकऱ्यांना शेती अवजारे देणे, बी बियाणे पुरवणे, त्याला प्रोत्साहन देऊन पाण्याची सोय करणे, आर्थिक मदतीची हमी देणे अशा गोष्टी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने केल्या पाहिजेत. अन्यथा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु राहण्याची शक्यता आहे.                            राज्यात दिवसेंदिवस आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी आत्महत्या करताना दिसत आहेत. यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.नांदेडमध्ये भोकर तालुक्यात कोळगाव येथे काही दिवसांपूर्वी योगेश गायकवाड या तरूण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वर्षापासून सतत नापिकीमुळे कर्ज काढले होते; परंतु शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड करू न शकल्याने त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात आशा दिलीपराव इंगळे या शेतकरी महिलेने सततची नापिकी आणि दुष्काळामुळे स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. आशा यांच्यावर जिल्हा सहकारी बँकेचे ८० हजारांचे कर्ज तसेच काही खासगी देणे बाकी होते. याच गावातील एका शेतकऱ्याने २००२ मध्ये अशाप्रकारे सरण रचून आत्महत्या केली होती. नापिकी आणि तीन लाखांचे कर्ज याला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यामधील घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे शंकर चायरे या शेतकऱ्याने नुकतीच आत्महत्या केली आहे. सुसाइड नोटमध्ये या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले होते. चायरे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून ते वाचले. त्यानंतर विष प्राशन करून त्यांनी आपले आयुष्य संपवले. अशा प्रकारे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात १९९५ ते २०१३ या कालावधीत ६०, ७५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१४ साली महाराष्ट्रात १९८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१५ मध्ये ३२२८ तर २०१६ मध्ये ३०५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१७ मध्ये २६६२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यात २०१८ मध्ये पहिल्या सहामाहीत सुमारे ११५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक व मध्यप्रदेशात आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे.                                 शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध माण्यांसाठी गेल्या वर्षी १ जून रोजी राज्यातील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला होता. ा संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता झालेली नाही.राष्ट्रीकिसान महासंघाने देशभरातील २२ राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारले होते. राज्य सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘स्वामीनाथन आयोगा’ची शिफारस लागू करणे आवश्यक आहे. आज शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्येकडे वळत आहे, ही गंभीर बाब आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजावून घेतल्या आणि योग्य उपाययोजना केली तर शेतकरी राजा सुखात राहील. सरकारने शेतकऱ्यांसाठी मानवीय दृष्टीकोनातून मदत करणे गरजेचे आहे. जगाचा पोशिंदा जगला, तरच जग जगेल. अन्यथा, डिजिटल इंडियाच्या सावलीत शेतकऱ्याचा नाहक बळी जाऊ नये.


                                               अशोक सुतार
                                               ८६००३१६७९८

आयोध्येतील राममंदिर : शिवसेनेची तिरकस चाल


           आयोध्येतील राममंदिर : शिवसेनेची तिरकस चाल

शिवसेनेच्या  दसरा मेळाव्यात सत्तेतील आपल्या सहपक्षावर म्हणजे भाजपवर जोरदार टीका करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला होता. आत्तापर्यंत दसरा मेळाव्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर शिवसेनेचे नेतृत्व टीका करत होते. परंतु यावर्षी सत्तेतील मित्र भाजपवर ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. भाजपने आयोध्येत राममंदिर उभारण्याचे दिलेले आश्वासन जुमलेबाजी आहे काय, असा उद्धव ठाकरेंनी सवाल केला.  राममंदिर जुमला आहे हे जाहीर करा असे भाजपला आव्हान देत ठाकरे यांनी परवा  २५  नोव्हेंबरला अयोध्येला जाणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे. मंदिर बनाऐंगे लेकीन तारीख नही बतायेंगे, मग मंदिर बांधायला सुरूवात कधी करणार ? ज्यांनी बाबरी पाडली, त्यात अनेक कारसेवक मारले गेले, त्यांच्या बलिदानाची किंमत ठेवा. म्हणून मी अयोध्याला जाणार आहे, से  उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिंदूना घेऊन मंदिबांधू. हिंदू कोणाच्या मालकी-हक्काची प्रॉपर्टी नाही, से आव्हान त्यांनी भाजपला दिले. यावर भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले  आहे.  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरूभाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांवर टिका केली आहे. निवडणुका जवळ आल्यावर त्यांना असे मुद्दे आठवतात असे सावंत यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे खरे वाटते. निवडणुका जवळ आल्या की धार्मिक प्रश्न बाहेर काढला जातो. आगामी निवडणुकानंतर सत्तेत आपल्याला जागा अधिक मिळाव्यात, अशी शिवसेनेची आत्तापासूनच रणनीती दिसत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपवर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडत नाही.  महाराष्ट्रात भाजपपेक्षा जास्त जागा मिळवणे, हे शिवसेनेचे उद्दिष्ट दिसत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपवर  महागाई आदी मुद्द्यांवरून तोंडसुख घेतानाच राममंदिराचा अडचणीत आणणारा मुद्दा शिवसेनेने बाहेर काढला आहे. मध्य प्रदेशात सध्या लोकांची भाजपवर नाराजी आहे. त्यातच काही उच्च जातींची मते आकर्षित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या  भेटीमुळे भाजप राम मंदिराबाबत ठोस निर्णय घेत नाही,से मतदारांना वाटून त्याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे.                                                                                                                                                                                       देशात एकाधिकारशाहीचा कारभार सुरू आहे,  सत्ताधाऱ्यांच्या मनमानीबद्दल शिवसेनेने सुरुवातीपासूनच आवाज उठवला आहे. पण आता  राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सरकारविरोधात बोलत आहे. दसरा दिनी संघ आणि भाजपचा सत्तेतील सहभागी पक्ष शिवसेनेने सत्ताधारी भाजपला कानपिचक्या दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशाच्या पत्रिकेत वक्री झालेले शनी आणि मंगळ आहेत, त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसेनेत आहे. शेजारच्या कर्नाटक सरकारने  दुष्काळ जाहीर केला, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही  धमक का दाखवत नाहीत, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. सरकार महागाई रोखू शकत नाही. अत्याचार रोखू शकत नाही.  कलम ३७० रद्द करा, अशा  मागण्याही  शिवसेनेने शिवाजी पार्कवरील मेळाव्यात  केल्या. लोकसभेत हा ठराव आणला तर शिवसेना भाजपच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहील, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, आम्ही लोकांना भरमसाठ आश्वासने दिली होती, कारण आम्हाला वाटले होते की, आम्ही निवडून येणार नाही. गडकरींच्या या बोलण्याला ठाकरे यांनी  निर्लजपणा, कोडगेपणा म्हटले आहे. मी टू बद्दल पंतप्रधान मौन की बात करीत आहेत, हे  गंभीर असून याचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे. निर्भयाचे आरोपी अजून लटकले नाही. कोपर्डीचं काय ? असा सवालही ठाकरेंनी सरकारला विचारला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काय, शेतकऱ्यांबद्दल सरकार मौनात आहे. या सर्व विषयांवरून शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे, त्यामुळे निदान महाराष्ट्रात का होईना शिवसेना भाजपवर विविध आरोप करून आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.  खरे तर शिवसेनेचे बोट पकडून भाजपा महाराष्ट्रातील राजकारणात आला आहे. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा पटकावल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रात गेली ३०वर्षे राजकारण करणारा शिवसेना पक्ष अस्वस्थ झाला होता. परंतु मोदी सरकारने लोकांना भरमसाठ आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली नाहीत. तसेच वाढती महागाई सरकार कमी करू शकलेले नाही. लोकांच्या या असंतोषाचा राजकीय फायदा घेण्याची राजकीय चाल शिवसेना खेळणार असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन केले होते. भाजपला शक्य तेवढी कोंडी करत अडचणीत पकडण्याचे तंत्र शिवसेना राजकारणात वापरणार आहे. आता उद्याच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आयोध्येट असतील. ते राममंदिर प्रश्नी अनेक व्यक्तीच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यांना जिथे सभा होती, त्या मैदानावर कार्यक्रम घेण्यास उत्तरप्रदेश राज्य सरकारने मज्जाव केला आहे; परंतु ते आयोध्येचा मुद्दा लोकांसमोर मांडणार आहे. आयोध्या प्रश्नी आपणच कसे आग्रही आहोत, यासाठी शिब्वासेनेची धडपड चाललेली दिसत आहे. हा भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणता येईल. मज्जाव  लोकसभा व विधानसभा निवडणूक होईपर्यंत ही राजकीय व्यूहरचना जनतेला पाहायला मिळेल. शिवसेनेने आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही राजकीय चाल सुरु ठेवल्याचे म्हणता येईल.   



VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर