ज्येष्ठ पत्रकार अशोक सुतार यांचे परखड लेख. दै. पुण्यनगरी, दै. देशोन्नती. दै. संचार, दै. वार्ताहर,दै. जनशक्ती, दै. प्रभात, सा. मार्मिक, दै. लोकमंथन, दै. महाराष्ट्र सम्राट, दै. सागर, दै. जनमुद्रा, दै. कर्नाळा, दै. महानायक इ.दैनिकांत राजकीय, सामाजिक विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध.
Saturday, 16 November 2019
महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे ?
महाराष्ट्राची
सत्ता कुणाकडे ?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की,
शिवसेनेची राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर
पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे.
लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. रालोआच्या बैठकीला शिवसेना हजर राहिली नव्हती हे विशेष. शिवसेनेने भाजपशी
असलेली युती केंद्र व राज्यातही तोडली आहे, असे दिसते. राज्यात निर्माण झालेल्या
राजकीय पेचानंतर शिवसेनेचे केंद्रीय
मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. शिवसेनेने भाजपशी फारकत घेतली असताना
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी सेनेची जवळीक वाढली आहे. महा शिवआघाडी होण्याच्या
तयारीत असल्याचे म्हटले जात असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे
की, दि. १७ नोव्हेंबरला
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र
राज्यात १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन
होणे अवघड आहे, पण शिवसेना-राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे सरकार पाच वर्षं टिकेल.
पवार यांच्या विधानाचा अर्थ लावायचा तर महा शिव आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी
अजून बराच वेळ लागणार असे दिसते.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अडीच अडीच वर्षांचा
मुख्यमंत्री असे काही ठरलेले नसून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे, यातूनच राज्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळेल, असाही विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचा राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी सातत्याने संपर्क आहे, त्यामुळे उशिरा का
होईना महा शिवआघाडी आकार घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी
म्हटल्याप्रमाणे, शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन महा शिवआघाडीचे
सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना तयार आहे. परंतु भाजपचे नेते आता पुन्हा एकदा,
महाराष्ट्रात आमचेच सरकार येणार असे म्हणू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा
निवडणुकीत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले, सर्वात मोठा पक्ष
म्हणून त्यांना राज्यपालांनी
सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. मात्र आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असा दावा त्यांनी त्यावेळी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
राजीनामा दिला. आता राज्यपालांनी घाईघाईने राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर भाजपाकडून सरकार आमचेच होणार, असे दावे केले जात
आहेत. भाजपकडे अपक्षांना सोबत घेऊन १२१ संख्याबळ होत आहे. अशा वेळी भाजपला
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांपैकी कोणत्या तरी पक्षाला सोबत घेऊन सरकार
बनवावे लागेल. परंतु यातील कुणाचाच पाठिंबा भाजपला नसल्यामुळे भाजप सत्तेसाठी
अपेक्षित संख्याबळासाठी घोडेबाजार करण्याची शक्यता आहे. तसा आरोपही राऊत
यांनी भाजपवर केला आहे. राऊत हे नुकतेच हॉस्पिटलमधून परतले आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेसबरोबर वाटाघाटी सुरू केल्यानंतर संजय राऊतांनी महा शिवआघाडी
होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला आहे.शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे. शिवसेनाला आता भाजपशी कुठल्याही
प्रकारे तडजोड करायची
नाही, असे
दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस
यांची आगामी काळातील भूमिका काय असेल याबद्दल चर्चा सुरु असताना
भाजपचे नेते चंद्रकांत दादांनी, मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचे पालुपद सुरु
ठेवले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि
शिवसेनेमध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे
ठरवावे लागेल, आगामी निवडणुकांमध्ये
तीनही पक्षांची भूमिका काय असणार यावर विचार करणे गरजेचे आहे.
राज्यात माह शिवआघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी तीनही पक्षांची भूमिका ठरवावी
लागेल. एका निश्चित राजकीय रणनीतीने पुढे चालण्याची गरज आहे. महा शिवआघाडीमुळे
राज्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसत आहे. भाजपचा सध्या एकच हेतू
आहे, तो म्हणजे दुसऱ्या पक्षांतील आमदार आपल्या बाजूने वळवायचे आणि अपेक्षित
संख्याबळ झाले की सत्तास्थापनेचा पुन्हा घाट घालायचा. त्यामुळेच भाजपकडे अपेक्षित
संख्याबळ नसताना भाजपचे नेते म्हणत आहेत की, आमचाच मुख्यमंत्री बनणार. असो.
राजकारणात अनेक डावपेच सुरु असतात. विरोधी पक्षाचे मानसिक बळ खच्ची करण्याच्या
दृष्टीने आम्ही कमी नाही, हे दाखवण्याची खेळी असते. भाजपची ही खेळी त्यातलीच एक
असावी. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने
सत्तास्थापनेची मुदत वाढवून न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून
काँग्रेस नेते
आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत. आम्हाला आता ४८ तासच नव्हे तर सहा महिन्याचा वेळ
राज्यपालांनी दिला आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. भाजपने सत्ता स्थापन
करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी
राज्यपालांनी पाचारण केले होते. नंतर राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे निमंत्रण
देण्यात आले. परंतु राष्ट्रवादीला दिलेली मुदत संपण्यापूर्वीच केंद्र सरकारने
राज्यपालांकडे शिफारस पत्र देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. यानंतर
राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण करण्यात आला आहे. भाजपने सत्ता स्थापण्यास
असमर्थता दाखवली असताना आता पुन्हा भाजपच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी आम्ही
इच्छुक असल्याचे म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत
चर्चा होऊन सत्तास्थापनेचे एकमत झाले असून त्यादृष्टीने चर्चा सुरु आहे. भाजपनेही याबाबत
‘थांबा आणि पहा’ ची भूमिका घेतली आहे. भाजपचे गेल्या पाच वर्षांतील राजकारण जनतेने
पाहिले आहे, त्यामुळे आता जनतेने काय पहायचे, त्यांनी काय दाखवायचे बाकी राहिले
आहे, ते समजत नाही. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी महा शिवआघाडीच्या सरकारबाबत
प्रयत्न सुरु केले असून शिवसेना, राष्ट्रवादीला कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी
यश येते का ते पहावे लागेल. भाजपच्या बड्या नेत्यांनी पुन्हा आमचाच मुख्यमंत्री ही
चर्चा (की अफवा ?) सुरु केल्यामुळे ते जनतेला कोणत्या राजकीय रणनीतीचे दर्शन
घडवणार हे पहावे लागेल. तोपर्यंत जनतेनेही ‘थांबा आणि पहा’ हीच भूमिका घेणे योग्य
वाटते. आपल्याला काय वाटते ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
व्याघ्रसंरक्षण काळाची गरज देशातील वाघांच्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक आहे. देशभरात २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या काल...
-
Ashok Sutar www.hasyanand.blogspot.com नोटाबंदी आणि बेरोजगारी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर गेल्या दोन वर्षांत सु...


No comments:
Post a Comment