अजितदादांचे बंड, शपथविधी आणि सत्तेचे गणित
Daily प्रीतिसंगम/ published on 24thNov2019 sunday
www.pritsangam.com
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली. अचानकपणे वादळ यावे, जमवलेल्या गोष्टी विखरून पाडाव्यात आणि नवीन गोष्टी तिथे येऊन वातावरणच बदलावे, असा प्रकार झाला. राजकारणात केव्हाही, काहीही घडू शकते, याची प्रचिती महाराष्ट्राला आली. शुक्रवारपर्यंत शिवेसेनेचे महा शिवआघाडी की महा विकासआघाडीची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरु होती. त्यादृष्टीने गेली ४-५ दिवस शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या चर्चा सुरु होत्या. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता महा विकासआघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार यावर तिन्ही पक्षांचे एकमत झाले. नंतर रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या अंधारात नवा राजकीय खेळ सुरु होऊन काही घडामोडी घडल्या आणि शनिवारी सकाळी थेट आठ वाजता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री म्हणून अजित दादा पवार यांनी विधानभवनात शपथ घेतली. सकाळी सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या दिग्गज मंडळीना ही धक्कादायक बातमी समजल्यावर सर्वजण सुन्न झाले. अजित दादा पवारांनी थोरल्या पवारांच्या अपरोक्ष भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापनेत पुढाकार घेतला. अजित दादांच्या या बंडाने राष्ट्रवादीच नव्हे तर शिवसेनाही हादरली आहे. अजितदादांनी कोणत्या कारणास्तव भाजपशी सोयरिक केली असेल, पक्ष नेतृत्वाला म्हणजेच पवार काकांना अंधारात ठेवून त्यांनी स्वतंत्र निर्णय का घेतला असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत. कोणी म्हणते अजित दादांच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा होता, यात काहीच तथ्य वाटत नाही. मुळातच अजित दादा पवार हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सत्ता समीकरणापासून दूर होते. म्हणजे असून नसल्यासारखे होते. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतून ते तडकाफडकी बाहेर निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता. त्यामुळे तेव्हाच त्यांच्या मनात काहीतरी राजकारण शिजले असावे. शनिवारी सकाळी विधानभवनात अजित दादांचा मनसुबा समजला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपशी मोठा संघर्ष केला. भाजपने राष्ट्रवादीतील दिग्गज मोहरे आपल्या गळाला लावले असताना आणि पक्षात कमी नेते शिल्लक राहिलेले असताना शरद पवारांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने फक्त राष्ट्रवादीलाच उभारी आणली नाहीतर कॉंग्रेसलाही काही जागा मिळवून दिल्या. पवारांचे खरे राजकीय कौशल्य तेव्हा पणाला लागले होते, नाहीतर आज राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट झाली असती, हे वास्तव आहे. त्यावेळी अजितदादा आपले पुत्र रोहित पवार यांना निवडून आणता येईल, या विचारात होते. अजित दादांनी भाजपशी नवी सोयरिक केली आहे खरी, परंतु सध्या स्थापन झालेल्या सरकारच्या विश्वास ठरावावेळी त्यांच्या बाजूने किती आमदार उभे राहणार, याबद्दल शंकाच वाटते. आता भाजपने सत्तेचे गणित जमवताना राष्ट्रवादीचा वजीरच आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे थोरले पवार काही वेळ विचारात पडले असतील. परंतु पवार असे स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाहीत. ते स्वतःला सावरून प्रतिपक्षाला कोंडीत पकडणारे आहेत. भाजपच्या खेळीनंतर शरद पवार आता जी खेळी करतील, ती वेगळीच असेल. तरीही अजित दादांनी आपल्या पक्षाशी बंड का केले, हा अस्वस्थ करणारा प्रश्न अनुत्तरीतच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकर परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीमधून अजित पवार अचानक उठून निघून गेल्यानंतर काय काय झाले यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री संध्याकाळी साडेसात वाजता महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पहिली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांना उद्धव ठाकरेंचे नेतत्व मान्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असेही स्पष्ट करण्यात आले. संजय राऊत यांनीही तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचा दुजोरा प्रसार माध्यमांना दिला. रात्री साडेआठ वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना संपर्क करुन सरकार बनवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांना संपर्क केला. शिवसेनेच्या नेत्यांबरोबर सुरु असणाऱ्या बैठकीमधून अजित पवार तडकाफडकी निघून आले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा भाजपाला पाठिंबा असल्याचे पत्र भाजपाच्या नेत्यांना दिल्याचे समजते. यासंदर्भात शरद पवार यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, आमदारांच्या सह्या असलेल्या पाठिंब्याचे पत्र दाखवून राज्यपालांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने सर्व आमदारांच्या सह्या घेतलेले हे पत्र असल्याचे ‘भास्कर डॉट कॉम’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. ऐत दादा हे राष्ट्रवादीचे अति महत्वाचे नेते असल्यामुळे त्यांच्याकडेच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या सह्या असलेले पाठिंबा पत्र देण्यात आले होते. यानंतर अजित पवारांनी आपला मोबाईल बंद करुन ठेवला. परंतु यावेळेपर्यंत राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला ही खबर नव्हती की, अजित दादा आता सत्तेचा वेगळाच डाव खेळत आहेत. शनिवारी रात्री बारा वाजल्यानंतर सत्तेचा डाव पलटी करण्याचे षडयंत्र सुरु झाले. भाजपाचे महत्वाचे नेते आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या काही आमदारांसहीत राजभवनामध्ये पोहचले. भाजपाने अजित पवारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर सत्ता स्थापनेचा दावा केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या सर्व घटनाक्रमाची माहिती लागू नये म्हणून लवकरात लवकर शपथविधी उरकून घेण्यासाठी फडणवीस आग्रही होते. मात्र राज्यपालांनी सकाळी शपथविधीचा वेळ दिला. सकाळी लगबगीने देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्रीपद व उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शुक्रवारी रात्री एक वाजता राज्यपालांनी महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील एक ई-मेल राष्ट्रपतींना पाठवला. राष्ट्रपती भवनातून हा ई-मेल गह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय मंत्रीमंडळाने यावर निर्णय घ्यावा यासाठी हा ई-मेल गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी रात्रीच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर करुन त्यावर मंत्र्यांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. हे मंजूरीपत्र राष्ट्रपतींना शनिवारी पहाटेच्या सुमार मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आल्याचे अध्यादेश राष्ट्पतींनी जारी केला. अजित दादांकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना मिळताच रात्रीच केंद्रातील भाजपकडून तातडीने तांत्रिक सोपस्कार पार पाडण्यात आले होते राजभवनामध्ये शनिवारी सकाळी आठ वाजताच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र हा शपथविधी सोहळा नक्की कधी पार पडला याबद्दल वेगवेगळी माहिती समोर येत आहे. राष्ट्पतींनी सकाळी सव्वा पाच वाजता राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेतली. त्यानंतर लगेचच फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली, असे म्हटले जात आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने सकाळी आठच्या सुमारास ही बातमी प्रसिद्ध केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनेही सकाळी साडेसातच्या सुमारास शपथविधी सोहळा पार पडल्याचे म्हटले आहे. तसेच शपथविधीसंदर्भातील बातमी सकाळी आठनंतरच प्रकाशित करण्यासंदर्भातील सुचना राजभवनामधून करण्यात आल्याचे देशातील एका आघाडीच्या दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. राज्यात घाईघाईने भाजपचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. परंतु या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी नक्की समजणार आहे की, अजित दादांना राष्ट्रवादीचे किती आमदार पाठिंबा देणार आहेत. भाजपचे संख्याबळ १०५ असून त्यांना १५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे समजते आणि अजित दादा पवारांसोबत किती आमदार येणार हे निश्चित नाही. भाजपला सत्ता स्थापेसाठी १४५ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीने जमवून आणलेले गणित अजितदादांच्या सत्तालोभापायी बिघडले आहे. अजित दादांनी शरद पवारांना अंधारात ठेवून हे कृत्य केले असून याचे अनेक राजकीय परिणाम दादांना भोगावे लागतील. शिवसेनेचे संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अजितदादांनी बंड करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्हाला काय वाटतं ?
- अशोक सुतार

![]() |
| अजितदादा पवार / अर्कचित्र : अशोक सुतार |

No comments:
Post a Comment