भारताचा वाघ - विंग कमांडर अभिनंदन
भारताचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकव्याप्त काश्मीरमधील एका गावाजवळ विमानातून उतरले. त्याचे कारण म्हणजे
पाकिस्तानच्या विमानांनी त्यांचे विमान पाडले आणि त्यांनी पॅराशूटच्या सहाय्याने
जमिनीवर आसरा घेतला. भारतीय विमान कोसळल्यानंतर अभिनंदन यांना स्थानिक लोकांनी
पकडून पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात दिले. लोक आपल्याकडे येत आहेत हे समजताच
अभिनंदन यांनी जवळच्या पाण्याच्या डोहात उडी घेतली आणि जवळची सर्व कागदपत्रे नष्ट
केली. एवढेच नव्हे तर त्यांनी सोबत आणलेला नकाशा आणि कागदपत्रेही खाल्ली. त्यांना
पाकिस्तानी जवानांनी ताब्यात घेतले. विंग कमांडर अभिनंदन म्हणतात की, पाकिस्तानी
जवानांनी त्यांना लोकांच्या हातून वाचवले. नंतर अभिनंदन यांची सखोल चौकशीही
करण्यात आली. अभिनंदन यांना पकडल्याची चित्रफित जेव्हा व्हायरल झाली, त्यावेलेल्स भारतीय
परराष्ट्र मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानला सुचना दिली की, तुम्ही
जिनिव्हा कराराचा भंग केला आहे. युद्ध कैद्याला मारहाण करून त्याची चित्रफित
दाखवणे, हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. तो जिनिव्हा कराराचा उघड उघड भंग आहे.
त्यामुळे आपली नाचक्की जगात होणार यामुळे पाकिस्तान सरकारने अभिनंदन यांना चांगली
वागणूक दिली असा एक व्हिडीओ जाहीर केला. यानंतर भारत सरकारने पाकशी वाटाघाटी करत
विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात पाठविण्याची विनंती केली. पाकिस्तानचे पंतप्रधान
इम्रान खान यांनी तशी परवानगी दिली. भारत आणि पाकिस्तानांत जर पुन्हा मैत्रीसंबंध
होणार असतील व तणाव निवळणार असेल तर आम्ही अभिनंदन यांना सोडविण्यास तयार आहोत,
असा संदेश पाकिस्तानने दिला व अभिनंदन यांची सुटका केली. विंग
कमांडर अभिनंदन यांना नुकतेच भारताच्या हवाली केले आहे. ते अटारी बोर्डरवर येताच भारतीयांनी एकाच
जल्लोष केला. भारतात सर्वत्र सोशल मिडीयावर अभिनंदन यांच्या सुटकेचे स्वागत
करण्यात आले. अभिनंदन यांचे वडील व आजोबा भारतीय लष्करात सेवेत होते. विशेष म्हणजे
दोघेही हवाई दलात होते. अभिनंदन वर्धमान यांना भारतात आल्यानंतर इंटरनॅशनल रेड क्रॉस
सोसायटीकडे सोपवण्यात येईल. त्यांची तपासणी करण्यात
येईल. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास
देण्यात आला आहे का, याचा तपास केला जाईल.
जिनेव्हा कंव्हेंशनप्रमाणे हे तपासणे गरजेचे असते.
नंतर त्यांचे डॉक्युमेंट तयार केले जाणार असून त्यानंतर त्यांना भारतीय वायुदलाकडे सुपूर्त केले जाणार आहे. चार दिवसांपूर्वी भारत
आणि पाकिस्तानच्या वायुदलांनी एकमेकांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर दोन्ही देशांमधला तणाव
शिगेला पोहोचला होता. हा तणाव निवळावा, युद्ध टळावे आणि
शांतता चर्चा व्हावी म्हणून अभिनंदन वर्तमान यांना शांततेचे पाऊल
म्हणून सोडण्यात येत आहे, अशी घोषणा
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान
यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत केली होती. विंग कमांडर अभिनंदन हे आता
आपल्या घरी जाणार आहेत. अटारी बॉर्डर मार्गे ६० तासांनंतर ते भारतात दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री 9 वाजून
20 मिनिटांनी अभिनंदन यांना भारताच्या
हवाली देण्यात आले. त्यावेळी त्यांच्याबरोबर पाकिस्तानी
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी फ़ारेहा बुट्टी देखील
आल्या होत्या. त्यांनीच अभिनंदन यांना भारताच्या हवाली केले. भारतीय हवाई दलाचा विंग
कमांडर अभिनंदन वर्तमान यांना
भारतात परतण्यास अपेक्षेपेक्षा अधिक वेळ का लागला, याची धक्कादायक माहिती समोर येत
आहे. जगभरात
आपल्या चांगुलपणाचा प्रचार व्हावा या उद्देशाने पाकिस्तानने अभिंदन यांना किती चांगली वागणूक दिली, याचा व्हिडिओ पाकिस्तान
सरकारने चित्रित
करण्यात वेळ घालवण्याने हा विलंब लागला आहे. वाघा बॉर्डरवर सोडण्यापूर्वी अभिनंदन
यांना आयएसआयच्या कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी अनेक तास बसवण्यात आल्याचे समजते. विंगकमांडर अभिनंदन यांना संध्याकाळी लाहोर येथे आणण्यात
आले होते. त्यानंतर
त्यांना आयएसआयच्या कार्यालयात नेण्यात आले होते, अशी माहिती मिळत आहे. याच कार्यालयात पाकिस्तानी
लष्करी अधिकारी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला कशा प्रकारे चांगली वागणूक
दिली हे अभिनंदनने सांगावे असा दबाव अभिनंदन यांच्यावर टाकण्यात आला. अभिनंदन
यांनी जे व्हिडिओत सांगितले ते लिहूनही द्यावे अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या.
अभिनंदन यांना भारतात परतण्यासाठी लागलेल्या विलंबाचे हेच कारण असल्याचे भारतातील
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. युद्धकैदी असलेल्या विंग कमांडर
अभिनंदन यांना पाकिस्तानने सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
युद्धकैद्यांबाबतच्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतच त्यांच्याशी व्यवहार
करण्यात आल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे. अभिनंदन यांनी विशेष विमानाने
भारतात यावे यासाठी भारताने प्रयत्न केले. अभिनंदन यांना सन्मानपूर्वक घेण्यासाठी
काही भारतीय अधिकारी पाकिस्तानात पाठवण्याची तयारीही भारताने केली होती. या
अधिकाऱ्यांची यादीही भारताने पाकिस्तानला दिली होती. या अधिकाऱ्यांमध्ये एक एअर
मार्शल आणि दोन विंग कमांडर यांचा समावेश होता. भारताची ही विनंती पाकिस्तानने
धुडकावून लावली. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना अधिकृत प्रक्रियेद्वारेच
भारताच्या ताब्यात देण्यात आले आहे. अभिनंदन यांना विमानातून बाहेर पडताना त्यांच्या
शरीरावर काही जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. ते भारतात परतले याचा भारतीय हवाई
दलाला अतिशय आनंद झाला आहे, अशा शब्दात
व्हॉइस एअर मार्शल आरजीके कपूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतीय
वायू दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या सुटकेचा भारतात सर्वत्र जल्लोष
होत आहे. त्याचवेळी आता एक बातमी आली आहे की, पाकिस्तानी विमान पाकच्या हद्दीत
पडले असताना पाकिस्तानी वैमानिकाला स्थानिक नागरिकांनी तो भारतीय आहे असे समजून
अमानुष मारहाण केली, त्यात त्या वैमानिकाचा मृत्यू झाला. अभिनंदन वर्तमान हे
पाकच्या भूमीतून सहीसलामत सुटले, हे विशेष होय. भारत सरकार व हवाई दलाने याप्रकरणी
योग्य भूमिका घेतल्याने हे शक्य झाले असे म्हणता येईल. परंतु शत्रू राष्ट्राच्या
तावडीत सापडलेला असताना प्रसंगी मार खाल्ला पण विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी
गुप्त माहिती उघड केली नाही. तसेच त्यांनी आपले मनोधर्य कायम राखले याबद्दल
वाघाच्या काळजाचे अभिनंदन यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

No comments:
Post a Comment