...सावधान
!
झाडांनी, झाडांसाठी,
झाडांकरवी केलेले
कायदे झुगारत वेली रान उठवताहेत,
वेलींचं
वागणं अवघ्या रानात अमान्य.
वेल सबल
होतेय खोल खोल मुळांपासून.
आत्तापर्यंत
झाडांसाठी खुप काही सोसलं,
तरीही
म्हणतील वेलींना आम्हीच पोसलं.
झाडंच
ती.... !
वेल म्हणजे
चपळपणा, सळसळते रक्त,
सूर्याला
भिडणारी योग्याची नजर.
झाडांना
हव्यात,
आधार
घेणार्या वेली,
शोषित, पीडित, बहिष्कृत केलेल्या.
वेलींनी
केव्हाच सोडून दिलंय,
लादलेलं
आनुष जगणं.
रान गारठून
स्तब्ध
वेलीचं
वेगळेपण बघत.
वेली
सूर्याला भिडत आहेत,
अवघं
विश्व जवळ करत आहेत.
झाडं
आता कुठं मान्य करतात,
वेलींचं
सबलीकरण.
तरीही
वेली जखमी होणं चालूच आहे.
झाडांनी
आता बदलावेत कायदे,
झाडांनी, झाडांसाठी, झाडांकरवी केलेले....
-अशोक सुतार
No comments:
Post a Comment