ज्येष्ठ पत्रकार अशोक सुतार यांचे परखड लेख. दै. पुण्यनगरी, दै. देशोन्नती. दै. संचार, दै. वार्ताहर,दै. जनशक्ती, दै. प्रभात, सा. मार्मिक, दै. लोकमंथन, दै. महाराष्ट्र सम्राट, दै. सागर, दै. जनमुद्रा, दै. कर्नाळा, दै. महानायक इ.दैनिकांत राजकीय, सामाजिक विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध.
Wednesday, 2 November 2016
भाजपाच्या राज्यात चाललेय काय?
केंद्रात भाजपाचे मोदीपणित सरकार सत्तारूढ झाले ते मोदींच्या अभिनव मार्केटींगमुळे, यात काही शंकाच नाही. मोदींनी चहाच्या गाड्यावर काम करण्यास सुरूवात केली म्हणे! असे ते म्हणतात, म्हणून आपण म्हणायचे. असो. तर मोदी हे भारतातील अन्य राजकीय नेत्यांपेक्षा कसे वेगळे आणि कियाशील नेते असल्याचे त्यांचा पचार करणाऱया जाहिरात कंपन्यांनी देशातल्या मतदारांवर बिंबवले. मोदींनीही `आम्ही सत्तेवर येताच अच्छे दिन आएंगे' असा ढोल अनेकवेळी पिटला. काँग्रेसच्या निष्किय गत सत्ताधाऱयांना कंटाळलेल्या मतदारांनी अगदी नाईलाजाने भाजपाच्या गळ्यात सत्तेची माळ घातली. भाजपाचे सरकार महाराष्ट्रातही सत्तेवर आले; पण नागरिकांचे हाल कमी न होता वाढतच चालले आहेत.
सद्यस्थितीत देशात धर्मांध शक्ती धुमाकूळ घालत आहेत. धर्माच्या नावावर गरीब, दलित वर्गावर अन्याय करत असल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वृत्तपत्रांत येत आहेत. भाजपाचे सरकार केंद्र व महाराष्ट्रातहि सत्तारूढ आहे. भाजपाची मातृसंघटना व सहकारी संघटनांचे कट्टर धर्मवादी कार्यकर्ते देशात धर्मरक्षण करण्याच्या नावावर सर्वसामान्यांचा छळ करीत आहेत, असे दिसते. खुद्द मोदीजींना या कार्यकर्त्यांना सांगावे लागते की, ``बाबांनो, तुमचे जे काही चालले आहे ते बंद करा. मला गोळ्या घाला पण दलितांना त्रास देऊ नका.'' मोदी असे का बोलले असावेत? कारण ; भारतीय संविधान! मोदी ज्या गोरक्षकांना बोलले, ते मोदींच्याच पक्षाचे कार्य करत असतात. पण मोदी पधानमंत्रीपदावर असल्याने त्यांना सदर गौरक्षकांना तंबी द्यावी लागते. भारतीय संविधान अवास्तव, धर्मांध, बाष्कळ बाबींना पाठीशी घालत नाही; सार्वजनिक जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला संविधानातील मानवी मुल्यांना जपावेच लागते (किंवा तसे दाखवावे लागेल), असे स्पष्ट होते. मोदींनी गोरक्षकांची कानउघाडणी केल्यानंतर सारे हिंदुत्ववादी नाराज झाले आणि मोदी भलत्याच पुरोगामी वळणावर निघाले असून याचे परिणाम भवितव्यात चांगले होणार नाहीत, असा धमकीवजा इशारा त्या दुखावलेल्या हिंदुत्ववादी नेते, कार्यकर्त्यांनी दिला. असो. भाजपा सरकार केंद्र व राज्यात येऊन दोन वर्षे झाली आहेत. मोदी विविध जाहिरातबाजी करीत सत्तेवर आले, हे सर्वश्रूत आहे. पण गेल्या दोन वर्षांत सर्व सामान्य माणूस (कॉमन मॅन) `अच्छे दिन' चा शोध घेत असल्याचे दिसते. पधानमंत्र्यांच्या नियमित परदेश वाऱया (पवास), नवीन आश्वासने, नव्या परदेशी कंपन्यांचे आगमन, जमिनींच्या खरेदी-विकींची वाढती पकरणे व वाढत्या किंमती, खाजगी कंपन्यांकडून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट, महागाई आदि पकार या दोन वर्षांत वाढल्याचे दिसते.
महाराष्ट्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडी घडल्या. भाजपाचा सहकारी राजकीय पक्ष `शिवसेना' पुवी राज्यात पबळ होता; पण शिवसेनापमुख बाळासाहेबांच्या निधनानंतर व मोदी लाट उचंबळून आल्यानंतर शिवसेना ही भाजपाच्या मागे (बॅकफुटला) पडली. राज्यात या पार्श्वभूमीवर भाजपा नेते व कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे आहे असे दिसते. खरे तर मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला; परंतु भाजपाने यावेही महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जय्यत तयारी केल्याचे दिसते, म्हणजे तसा आव आणला आहे. मुंबईतील गुजराती, मारवाड्यांची मते आपणास मिळतील, या आशेवर भाजपाचे नेते आहेत. मंबई महापालिकेत नुकताच खड्डयांच्या पश्नावरून शिवसेना- भाजपात राडा झाला. त्यातच दसरा मेळाव्यादिवशी भाजपाचे नेते, खासदार किरीट सोमैया यांच्यावर काही विरोधकांनी हल्ला केला, ते शिवसेनेचे असल्याची चर्चा आहे. यावरून या दोन पक्षांत संघर्ष पेटला आहे. मुंबई मनपाची निवडणूक आम्ही स्वबळावर लढू, असा इशारा शिवसेना नेतृत्वाने दिला आहे. गोवा येथे रा.स्व. संघाच्या मनमानी धोरणाला विरोध करीत सुभाष वेलिंगकर यांनी भाजपाच्या विरोधात नव्या पक्षाची (गोवा सुरक्षा मंच) स्थापना केली असून या पक्षाशी युती करण्याचे शिवसेनेने जवळ जवळ निश्चित केल्याचे दिसते. शिवसेनेच्या निमित्ताने गोव्यात आता भाजपाच्या डोकेदुखीत अजून वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत आपापल्या मागण्यांसाठी निघणारे मराठा मोर्चे, ओबीसी मोर्चे मागासवगीय संघटनांचे मोर्चे सातत्याने पहायला मिळत आहे. या मोर्च्यांमागे भाजपा विरोधकांचे राजकारणहि असू शकते, परंतु राज्यातील सत्ताधाऱयांवरहि तसे आरोप होत आहेत. एकूणच राज्यातील सामाजिक स्वास्थ बिघडले आहे, असेच म्हणावे लागेल. उत्तर पदेशात आगामी विधानसभा निवडणुकीत मतांच्या ध्रुवीकरणासाठी पुन्हा `राम मंदिरा'चा मुद्दा भात्यातून बाहेर काढण्याचे पयत्न भाजपा नेतृत्वाकडून जोरदारपणे सुरू आहे.
सद्यस्थितीत पुण्यात भाजपाचे नवे राजकारण सुरू असल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गुंडांचे इनकमिंग जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. बाबा बोडकेची भाजपशी सलगी सुरू आहे तर खा. संजय काकडे यांच्या पुढाकाराने सचिन ऊर्प पप्पू घोलप, श्याम शिंदे आणि पिंट्या धाडवे या तीन गुंडांनी यापूर्वीच भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था नीट राहणार का, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. तसे पाहिले तर राजकारण आणि गुंड यांचे संबंध सद्यस्थितीतील राजकारणात नवे नाहीत. एकीकडे भाजपाचे पुण्यातील नेते व पालकमंत्री गिरीष बापट पत्रकारांना ठणकावून सांगतात की, आमच्या पक्षात गुंड- पुंड असा पकार दिसणारच नाही; पण ते असे बोलतात न बोलतात तोच दुसरीकडे पुण्यातील गुंड बाबा बोडकेच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले. या गुंडांना प्रवेश देताना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या चेहऱयावर आनंदाचे भाव होते. घोलप याच्यावर खून, जाळपोळ, दरोडा तर धाडवेवर खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. शिंदे याच्यावर पोलिसाला मारहाण, दंगल माजवणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, पक्षात गुंडांना घेणार नसल्याचे सांगतात. जो सत्ताधारी पक्ष असतो, तिथे जोरात इन्कमिंग सुरू असते हे एकवेळ समजू शकते; पण भाजपाला पक्षात गुंडांचे इनकमिंग करण्याची आवश्यकता का वाटू लागली आहे, हे समजण्यापलिकडचे आहे.
खरे तर महाराष्ट्रात जिकडे तिकडे विविध जातींचे मोर्चे निघत आहेत, मुस्लिम समाजाचाहि मोर्चा निघाला. राज्यात कधी कुठल्याहि पश्नावरून दंगल होईल, याचा नेम नाही. एकूण कुणालाच सुरक्षित वाटत नाही. शेतकऱयांचे धान्य रास्त दरात विकले जाईल याची शाश्वती राहिलेली नाही. शेतकऱयांच्या मालाला हमीभाव नाही, त्यांना दिली जाणारी सबसिडी वेळेवर मिळत नाही, ऊसाचे बिल वेळेवर नाही यामुळे शेतकरीहि आंदोलन करीत आहेत. मतदारांनी राज्य व केंद्रातील सत्ता भाजपाच्या हाती सोपविली आहे. पधानमंत्री मोदींनी आता विदेशी दौरे कमी करून देशातील मुलभूत पश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मोदींनी लोकसभा निवडणुकांपुवी जनतेला जी आश्वासने दिली, ती पूर्ण करणे अवघड असून आता मोदींचीच दमछाक होत आहे. त्यांनी परदेशी कंपन्यांच्या हितापेक्षा देशातील विविध घटकांचे पतिनिधीं, उद्योगपतीं, तज्ञांशी सुसंवाद ठेवून विकासशील भारत घडविण्याकडे वाटचाल करणे आवश्यक वाटते. परंतु भाजपाच्या सहकारी धर्मवादी संघटना आता आयोध्या मंदिराचा वाद नव्याने उकरून काढत आहेत. मुस्लिम व मागासवगीयांना हिन लेखून पुन्हा `मनुस्मृती' चे धडे हे धर्मवादी गिरवू पहात आहेत, देशाच्या पगतीसाठी ही निश्चितच सकारात्मक परिस्थिती नाही. भरीस भर म्हणून महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपाचे मित्रपक्ष शिवसेनेशी संबंध ताणले जात आहेत. अशा परिस्थितीत आता सत्ताधारी भाजपचे झेंडे गुंडांच्या खांद्यावर दिसू लागले तर जनता सुरक्षित कशी राहणार, याचे पश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
व्याघ्रसंरक्षण काळाची गरज देशातील वाघांच्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक आहे. देशभरात २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या काल...
-
Ashok Sutar www.hasyanand.blogspot.com नोटाबंदी आणि बेरोजगारी केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर गेल्या दोन वर्षांत सु...
No comments:
Post a Comment