Thursday, 12 July 2012

आमआदमीला श्रीमंत बनवण्याची आयडिया

आमआदमीला  श्रीमंत बनवण्याची आयडिया

 चिदंबरंमना  हल्ली काय झाले आहे तेच समजत नाही.आम आदमी आइस्क्रीम आणि बाटलीबंद पाणी पितो
तेव्हा बिल देताना तक्रार करीत नाही पण गहू किंवा तांदळाचा दर एक रुपयाने वाढला तर खुप संवेदनशील बनतो असे चिदंबरम नुकतेच म्हणाले.यापूर्वी नियोजन आयोगाने जो मनुष्य दिवसाकाठी 32ते 36रुपये खर्च करील तो  श्रीमंत समजावा असे जाहीर करुन आपण विनोदी असल्याचे दाखवून दिले होते.त्यानंतर खुद्द नियोजन आयोगाने
35लाखाचे टॉयलेट बांधून भारतातील गरिबांचा पैसा उडवला.आता चिदंबरमनी आम आदमीला श्रीमंत बनवण्याचा चंग बांधला आहे.भारतात श्रीमंत लोक राहतात असे जगाला दाखवण्याचा केंद्र सरकारचा उद्देश तर  नसेल ना अशी शंका हास्यानंदाच्या मनात आलीआणि याची माहिती काढण्यासाठी हास्यानंद दिल्लीला
पोहोचला. पंतप्रधानांच्या बंगल्यावर हास्यानंद पोहोचला.सुरक्षारक्षकाने आमची नीट तपासणी केली आणि विचारले,काय जनपथवरून आलात? आम्ही म्हटले,नाही.पण तुम्हाला कसे वाटले कि मी तिथून आलोय.?सुरक्षारक्षक हळूच आमच्या कानाला लागून म्हणाला,अहो, हे लोकशाहीचे मंदिर आहे.इथे येणारे प्रथम मुख्य मंदिरातील देवीचे दर्शन घेतात.नंतर इथे येतात.लवकर बोला,साहेबांना दुसरी कामे आहेत.परदेशी कंपन्याना कुणाची जमीन विकायचीय कि खाजगी शाळेला अडमिशन हवे आहे?त्यावर आम्ही म्हणालो,मी  आमआदमी  आहे  आणि मनमोहन साहेबांना भेटायचे आहे.थोडया वेळातच आम्ही पंतप्रधानांसमोर बसलो होतो.मला ओळखलं का ?आम्ही  विचारताच मनमोहनजी म्हणाले ,नाही हो .मला दररोज हजारो लोकं भेटतात त्यामुळे कुणाकुणाला लक्षात ठेवणार ?मला खरं सांगा , तुम्ही जनपथमधून तर आला नाही ना !नाहीतर तुमची व्यवस्था पाहिली नाही म्हणून मला मडम रागावतील.मनमोहन हळू आणि दबक्या आवाजात
बोलत  होते.आम्ही म्हणालो,मी खरेच आमआदमी आहे.तुम्ही आम आदमीला श्रीमंत बनवण्याची योजना आखलीय.
मनमोहनजी  इकडेतिकडे  पहात  म्हणाले,खरं तर हे जे काही सुरु आहे ते मला आवडत नाही.मी इथे अडकून पडलोय.पण  मी माझे विचार मनमोकळेपणाने  मांडू शकत नाही.मी चांगला अर्थतज्ञ आहे,पण मी राजकरणात अडकल्यामुळे जसे आदेश येतील त्याप्रमाणे निर्णय घेतो.मीही एक आमआदमीच
आहे.असे म्हणून मनमोहनजी मौनात गेले.

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर