Sunday, 19 November 2017

नारायण राणेंसमोर निवडणुकीचे आव्हान

शिवसेनेने ज्यांना मुख्यमंत्री बनवले होते, ते सेनेचे पूर्वाश्रमीचे नारायण राणे काही
किरकोळ कारणावरून काँग्रेसमध्ये गेले. जाताना त्यांनी शिवसेना नेतृत्वावर तुफान
टिका केली होती. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे
यांना मुख्यमंत्री बनवून राणेंवर मोठा विश्‍वास दाखवला होता. राणे यांनी
मुख्यमंत्रीपदी असताना राज्य कारभार व्यवस्थितही केला होता. परंतु शिवसेनेत कुठे
माशी शिंकली कोणास ठाऊ क, परंतु राणेंना शिवसेनेत आपल्या पाठीमागे काहीतरी
राजकारण होत आहे, असे वाटू लागले. त्यावेळी बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव
ठाकरे नुकतेच सेनेत वावरु लागले होते. आता आपले अधिकार कमी होणार आणि
आपल्याला बाजूला व्हावे लागणार, ही भीति राणेंच्या मनात असावी, असे वाटते.
सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबईतील चेंबूर पट्टा आपल्या ताब्यात असला की महाराष्ट्रावर
आपले वर्चस्व आहे, असे राणेंना वाटत होते. राणेंनी अशा संभ्रमावस्थेत शिवसेनेतून
बाहेर पडण्याचा 13 वर्षांपूर्वी निर्णय घेतला होता. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले.
त्यावेळी शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून, ‘राणे काँग्रेसवासी झाले !अशी मार्मिक
टिप्पणी केली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे स्वत।सोबत 9 ते 10
आमदार घेउन गेले होते. काँग्रेस पक्षाची एक प्रतिमा आहे. काँग्रेसमध्ये गेलेल्या
नेत्याने नेहमी संयम राखून पक्षाचे काम करायचे असते. परंतु राणे मूलत। सेनेच्या
आक्रमक स्टाइलचे असल्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये रूळण्यासाठी बराच अवधी
लागला. काँग्रेसध्ये मुख्यमंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद व इतर काही वरच्या पदासाठी
अगोदरच बरेच नेते नंबर लावून उभे असताना राणेंनी काँग्रेस प्रवेश केलेला इतर
काही जणांना रुचला नसावा, असे वाटते. राणेंनी आपल्या मागण्या पक्षश्रेष्ठींच्या
कानावर घालण्याचा प्रयत्न केला, पण राणे यांच्यापूर्वीचे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते
असल्यामुळे राणे यांच्या नावाचा काँग्रेसमध्ये लवकर विचार झाला नाही. परंतु एक
बाब खरी की, काँग्रेस पक्षाने राणेंना दोनवेळा आमदारकीची उमेदवारी देऊनही
राणेंना या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करता आला नव्हता. स्वत।च्या
मतदारसंघात म्हणजे कणकवलीत राणे पराभूत झाले. नंतर राणे स्वत।च काँगेस

पक्षावर नाराज झाले होते. पण राजकारणात यश, अपयश यांकडे सम्यक नजरेने
पहावे लागते. राणे यांनी अनेकवेळा स्वपक्षातील नेत्यांवर दुगाण्या झाडल्यामुळे
काँग्रेसचे नेते त्यांच्यापासून दोन हात लांबच राहणे पसंत करीत होते. नंतर
काँग्रेसची संस्कृती आत्मसात न करताच राणेंनी बारा वर्षांनंतर काँग्रेस पक्षाला राम
राम केला व काँग्रेसच्या काही नेत्यांवर दुगाण्या झाडण्याचे काम सुरु केले. काँग्रेसला
सोडचिट्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केलेल्या माजी मुख्यमंत्री
नारायण राणे यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका
जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रिय निवडणूक
आयोगाने निवडणूक कार्यक्रमही जाहीर केला आहे. गेल्या 22 सप्टेंबर रोजी काँग्रेस
पक्षाला सोडचिठ्ठी देत नारायण राणे यांनी आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा
राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला
पोटनिवडणूक होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला याची अधिसूचना जारी करण्यात
येणार असून, 29 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
आहे. गुरूवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून
सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. नारायण राणे यांना भाजपने
मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मात्र शिवसेनेचा नारायण राणेंना मंत्रीमंडळात घेण्यास
तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे.
मुख्यमंत्री सुरुवातीला शिवसेनेच्या भीतिमुळे राणेंना मंत्रीमंडळात घेण्यास राजी
नव्हते. कारण हा प्रयोग विद्यमान भाजप सरकारच्या अंगलट आला तर तेलही
गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणे असे व्हायला नको, असा विचार
मुख्यमंत्र्यांच्या मनी आला असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राणे आणि
शिवसेनेचा पूर्वीपासून चाललेला संघर्ष पाहता, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीत
शिवसेना भाजपला याबाबत कदापि समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे राणे यांना या निवडणुकीत निवडून आणणे भाजपला सोपे राहिलेले नाही.
राणे भाजपध्ये जाणार असल्याच्या अफवा सर्वत्र मोठया प्रमाणात प्रसारमाध्यमांत
पसरल्या गेल्या. गणेशोत्सवादरम्यान राणे व त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे
मुख्यमंत्र्यांना गणेशदर्शनानिमित्त भेटले होते. त्यावेळी राणे भाजपमध्ये प्रवेश

करणार असल्याची चर्चा नुकतीच सुरु झाली होती. राणे त्यापूर्वी अहमदाबाद येथे
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटल्याची सर्वत्र चर्चा होती. राणेंच्या
पक्षप्रवेशासाठी दसर्‍याचा मुहूर्तही ठरला. परंतु भाजप नेतृत्वाची वाट पाहून राणे
कंटाळले आणि त्यांनी स्वत।चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षकाढला. या पक्षाची
स्थापना होउन पहिला मेळावा कणकवलीत झाला. भाजप नेतृत्वाने राणे यांना राज्य
सरकारच्या मंत्रीमंडळात घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे राणे यांना विधान
परिषद निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे.
राणेंनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्यामुळे
निवडणूक एकाच जागेसाठी आहे आणि राणेंना विधान परिषदेच्या निवडणुकीत
निवडून येण्यासाठी 145 मतांची गरज आहे, ही सत्य परिस्थिती आहे. भाजपाकडे
122 आमदार आहेत, भाजपच्या आमदारांची 122 ते राणेंना मिळतील असे गृहीत
धरले तरी राणेंना जिंकण्यासाठी आणखी 23 मतांची गरज आहे. ही मते कुठून
आणायची अशा संभ्रमावस्थेत राणे आणि भाजप पक्षाचे नेते आहेत. विधानसभेत
भाजप-122 , शिवसेना-63, काँग्रेस-42, राष्ट्रवादी-41,शेकाप- 3, बहुजन विकास
आघाडी 3, एमआयएम -2, अपक्ष-7, समाजवादी पार्टी-1, मनसे-1, रासपा-1,
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया-1 अशी पक्षनिहाय स्थिती आहे. एकदा राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला उद्देशून म्हणाले होते की, काही अदृश्य
हात त्यांच्या पाठीशी आहेत, त्या बळावर भाजप नवे सरकार उभे करू शकते. या
अदृश्य हातांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून विशेष कामगिरी केली
होती. आता राणेंच्या विधानपरिषद निवडणुकीदरम्यान असा काही चमत्कार होणार
का, याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे. कारण राणेंना शिवसेनेची 63 मते
मिळणार नाहीत, राणे भाजप आघाडीशी संलग्न झाल्यामुळे त्यांना डाव्या पक्षांचा
पाठिंबा मिळणे शक्य वाटत नाही. या निवडणुकीत चमत्कार कसा घडवायचा, या
प्रश्‍नात भाजपचे दिग्गज नेते आहेत. राष्ट्रवादी पक्षाने मनात आणले तर राणे या
निवडणुकीत निवडून येऊ शकतात, परंतु हे सर्वस्वी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वावर
अवलंबून आहे. राणेंनी आत्तापर्यंत दोन पक्ष सोडले आहेत आणि त्यांनी या पक्षांतून
बाहेर पडल्यानंतर त्या त्या पक्षांवर, नेतृत्वावर व नेत्यांवर जोरदार टिका केली

आहे. पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेशी राणेंनी विनाकारण पंगा घेतला होता. परंतु तसे
काँग्रेसबाबत झाले नाही. कारण काँग्रेस नेत्यांनी राणेंच्या आरोपांना संयमतेने
प्रत्यूत्तर दिले होते. काँग्रेसने राणेंना दोनवेळा विजयाची संधी मिळवून दिली होती,
ही काही काँग्रेस नेत्यांनी दिलेली प्रतिक्रीया अतिशय बोलकी होती. काँग्रेसच्या या
प्रतिक्रीयेनंतर राणेंनी काँग्रेसशी वाद करणे टाळले होते. आता खरी परीक्षा राणेंची
आहे. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री, उत्कृष्ट संसदपट्टू असणार्‍या नारायण राणे
या दिग्गज नेत्यासमोर विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्याचे आव्हान
सोपे राहिलेले नाही. यातून ते कसा मार्ग काढतात, हे पाहणे गरजेचे आहे.
राजकारणात सर्वकाळ तीच परिस्थिती नसते, याचा प्रत्यय या निमित्ताने येत आहे.

कालाय तस्मै नम ।

No comments:

Post a Comment

VISHWARATNA BLOOD PAINTING BY ASHOK SUTAR

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर